By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2019 03:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अवकाळी पावसामुळे साथीच्या रोगांचा धोकाही वाढलाय. राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया या साथीच्या रोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत चार जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
डेंग्यू आणि चिकनगुनिया या साथीच्या रोगांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून काळजी वाढवणारे आकडे समोर आलेत. राज्यात डेंग्यूचे 390 तर चिकन गुनियाचे 703 रुग्ण आहेत.2017, 2018 मध्येही देशभरात सर्वाधिक डेंग्यूबळींची नोंद महाराष्ट्रात झाली होती. चिकनगुनियाच्या रुग्णांमध्येही पाच वर्षांत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. दोन्ही आजारांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारला फारसे यश आलेले नसल्याचे दिसते.
काय आहे डेंग्यू
डेंग्यू हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. एडीस इजिप्ती आणि एडीस अल्बोपिक्टस या डासांच्या मादीमार्फत हा आजार पसरतो तसेच डेंग्यू ज्या डासांमुळे पसरतो त्याच डासांमुळे चिकनगुनिया हा आजारही पसरतो.
तीव्र ताप, सांधेदुखी, स्नायुदुखी, डोळ्यांमागे वेदना होणे, उलटय़ा होणे, पोटात दुखणे, रक्तस्राव ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.
डेंग्यू डासाच्या पैदास वाढण्यास ठिकठिकाणी साचलेले पानी कारण ठरते.
भारतासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. ते आव्हान आहे वादळ. महा आणि बुलबुल ह....
अधिक वाचा