ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशभरात पुन्हा एकदा डेंग्यूचं थैमान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 04:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशभरात पुन्हा एकदा डेंग्यूचं थैमान

शहर : देश

डेंग्यूने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. कल्याण, ठाणे, मुंबई, नाशिक अशा अनेक शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन मात्र उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचं समोर आलं आहे.

हैदराबादमध्ये यावर्षी डेंग्यूने थैमान घातलंय. डेंग्यूचे सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रूग्ण हैदराबादमध्ये आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हैदराबाद इथे जाणाऱ्या नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. मागील महिन्यात वसई-विरारमध्ये दोन महिलांचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर एका आठवड्यातच डेंग्यूमुळे आणखी एका मुलीने देखील आपला जीव गमवला होता.ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना देखील डेंग्यूची लागण झाल्यामुळे मुंबईतील खार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आले होते.डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेट्स काउंट झपाट्याने कमी होतात. ज्यामुळे रूग्णाच्या जीवाला धोका तयार होतो. डेंग्यूची लागण झाल्यानंतर ताबडतोब योग्य उपचार घेतले पाहिजे.

डेंग्यूची लक्षणं

- ताप येणं

- डोकं दुखणे

- सांधे दुखी

- पोटदुखी

- उलट्या होणं

- हिरड्यांमधून रक्त येणं

- श्वास घेण्यास त्रास होणं

- थकवा

मागे

पुण्यातील या सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन आर्थिक निर्बंध घातले
पुण्यातील या सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन आर्थिक निर्बंध घातले

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. आर्थिक ....

अधिक वाचा

पुढे  

टाटाची इलेक्ट्रिक कार लॉन्च
टाटाची इलेक्ट्रिक कार लॉन्च

टाटा मोटर्सने आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीने ही इलेक्ट्र....

Read more