By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुसळधार पावसाने मुंबईची अगदी तुंबई केली. याच परिस्थितीवर बोट ठेवत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. “बीएमसी कायमच नालेसफाई झाल्याचा दावा करते. यावेळी तर पालिका प्रशासनाने 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र ही हात सफाई आहे,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नालेसफाई पूर्ण झाली म्हणून सांगितलं जातं, पण ती पूर्ण झालेली नाहीत. यात हातसफाई झाली का? अशी शंका उपस्थित होते. दक्षिण मुंबईतही या वेळेला पाणी साठले आहे. आमच्या नेत्यांनीही महापालिकेला सांगितलं होतं की नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि पंम्पिंग स्टेशनचे प्रकल्प धीम्या गतीने चालू आहेत याला टॉप मोस्ट प्रायॉरिटी दिली नाही, तर मुंबईची परिस्थिती अशीच राहील. मी म्हणेन की 113 टक्के नालेसफाई ही फक्त सफाई आहे. ती कुठली सफाई हे तुमच्या लक्षात येते.”
“नालेसफाईचं काम किती झालं? मध्यंतरीच्या काळात मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यांच्यासह आमचे सर्व नेत्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क करत नालेसफाई झाली नसल्याचं सांगितलं होतं. पम्पिंग स्टेशनचे प्रकल्प अत्यंत धीम्या गतीने सुरु आहेत. याला आपलं पहिलं प्राधान्य बनवायला हवं. असं समजून जोपर्यंत बीएमसी काम करणार नाही तोपर्यंत मुंबईची परिस्थिती हीच राहिल,” असं फडणवीस म्हणाले.
“मुंबईत एनडीआरएफला लोकांना बाहेर काढावं लागलं ही गंभीर परिस्थिती”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दरवर्षी मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती सुधारलेली कुठेही दिसत नाही. काल ज्याप्रकारे मुंबईमध्ये पाणी जमा झालं आणि एनडीआरएफला (NDRF) लोकांना बाहेर काढावं लागलं. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. सातत्याने बीएमसीकडून आम्ही पम्पिंग स्टेशन बांधत असल्याचं सांगितलं जातं. हे होताना दिसत नाही. त्याला गती मिळत नाही.”
“आता आपण पाहिलं की भिंत पडल्यामुळे कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु मागच्या वेळेला भिंत पडल्यामुळे जीवितहानी झाली होती. मुंबई महापालिकेने अशा धोकादायक ठिकाणांची यादी तयार केली होती. त्या यादीपैकी किती ठिकाणी काम झालं ते कोणालाही माहिती नाही. म्हणून मला वाटतं की याकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. पंम्पिंग स्टेशनची कामं वेळेत पूर्ण केली पाहिजे,” असं फडणवीसांनी सांगितलं.
“क्लायमेट चेंज हे सत्य, मुंबईतील स्थिती हा जगाला इशारा”
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत एकूणच जो वादळी पाऊस झाला असं मी कधीच पाहिलं नाही. मुंबईत मागील 48 तासात 500 मिमी पाऊस झाला आहे. वादळं मोठ्या प्रमाणात होतं, झाडं कोसळली, इमारती हालत होत्या, अनेक ठिकाणी पत्रे उडाले आहेत. हे वेगळं चित्र आहे. मी मागील 2-3 वर्षांपासून बोलत आलो आहे की जागतिक हवामान बदल (क्लायमेट चेंज) होत आहे. 48 तासात 500 मिमी पाऊस पडला हे आपण आधी कधी ऐकलं असेल असं वाटत नाही. या गोष्टींवर कसं काम करायचं यावर चर्चा करुन नियोजन होईलच.
मुंबईतील स्थितीवरुन विरोधकांनी केलेले आरोप हास्यास्पद : आदित्य ठाकरे
“सध्यातरी इथं काही मदत करता येईल का याची पाहणी सुरु आहे. जागतिक हवामान बदल हे सत्य आहे आणि हा जगाला इशारा आहे. आता आपण ते स्वीकारुनच पुढील नियोजन करायला हवे. विरोधकांचे जे आरोप आहेत ते हास्यास्पद आहेत. आत्ता मला राजकारणात जायचं नाही. सध्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. काल जो वादळी पाऊस झाला त्याच्यासमोर जगात कुणीही उभं राहू शकत नाही. असं असतानाही मुंबई पुन्हा रस्त्यावर आली आहे. आपण काम करतो आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरि....
अधिक वाचा