By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2020 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना आम्ही मेट्रो प्रकल्प आणि कारशेडशी भावनिकदृष्ट्या जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे तोडगा कुणीही काढाला तरी आनंदच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करतील. गरज पडली तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटतील अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. त्यानंतर फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पवार यांची मध्यस्थी आणि कारशेडचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.
शरद पवार अहवाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेतील
महाविकास आघाडीतर्फे कांजूरमार्ग येथे उभारण्यात येत असलेल्या मेट्रो कारशेडला भाजपचा विरोध आहे. याच भूमिकेतून कारशेड उभारण्यासाठी आरे येथील जागाच योग्य असल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात येतोय. तर महाविकास आघाडी सरकार कारशेड कांजूरमार्ग येथेच उभारण्यावर ठाम आहे. न्यायालयाने कांजूरमार्ग येथे सुरु असलेल्या कारशेडच्या कामाला थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर आता शरद पवार याबाबत तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी बोलणार आहेत. गरज पडलीच तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशीसुद्धा बोलतील अशी माहिती नवाब मलिक यांनी रविवारी (20 डिसेंबर) दिली.
याबाबत बोलताना, “जी मेट्रो 2021 साली सुरु होणार असेल, ती 2024 मध्ये का सुरु करायची. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलावे. आम्हाला काहीही अडचण नाही. तोडगा कुणीही काढला तरी आम्हाला आनंदच असेल,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल जेव्हा शरद पवार वाचतील तेव्हा तेही योग्य निर्णय घेतील. तेही आम्हाला विरोध करणार नाहीत अशी खोटच टिप्पणी फडणवीस यांनी केली.
मेट्रो प्रकल्पाशी भावनिक नाळ
आरे येथील कारशेडबद्दल बोलताना, “आरे येथे कारशेड उभारण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. आरे येथे कारशेड उभाल्यानंतर एक इंचही जास्त जागा तिथे लागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरेत कारशेड उभारण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आम्हीसुद्धा सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत,” अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. तसेच या प्रकल्पासी आम्ही भावनिक दृष्टिकोनातून जोडले गेलेलो आहोत. त्यात मेट्रोचे काम 80 टक्के पूर्ण झालेले आहे. आरे येथे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा प्रोजेक्ट अडचणीत आणण्यासारखं होईल,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल वाचण्याचा सल्लाही यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (20 डिसेंबर) जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी कारशेडच्या प्रश्नावरून भाजपला भावनिक साद घातली. कांजूरमार्गच्या जागेवरुन सुरु असलेला वाद राज्याचा आणि जनतेच्या हिताचा नाही. हा कद्रुपणा सोडायला हवा. आम्ही या कामाचं श्रेय तुम्हाला देण्यास तयार आहोत. तुम्ही हा प्रश्न सोडवा, अशी साद मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना घातली आहे. इथे तुमच्या किंवा माझ्या इगोचा प्रश्न नाही. तर जनतेच्या हिताचा मुद्दा असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाचा धोका अद्यापही कायम असताना राज्यात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागत....
अधिक वाचा