By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या चरणी एका भक्ताने तब्बल ३५ किलो सोने दान केले आहे. २८ जानेवारीला माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने १५ जानेवारीपासून पाच दिवस शेंदूर लेपनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. ते सोमवारी उघडण्यात आले. मंदिर बंदच्या काळात नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी३५ किलों सोने दान केले. या सोन्याची किंमत १४ कोटीच्या घरात असल्याचे म्हंटले जात आहे.
Maharashtra: A devotee from Delhi has donated gold plating weighing around 35 kg, worth around Rs 14 crores to Mumbai's Shri Siddhivinayak Temple. pic.twitter.com/2eavuvJjmk
— ANI (@ANI) January 21, 2020
गणपती बाप्पाच्या चरणी सोने चढवणाऱ्या या भक्ताची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टीना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. त्यानंतर रीतसर पूजा आणि विधी करून बाप्पाला आरसा दाखवण्यात आला.
मुंबई - बदलत्यास्वरुपातील गुन्हेगारीचा तसेच दहशतवादाच्या आव्....
अधिक वाचा