ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 01, 2020 11:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी

शहर : मुंबई

धारावीतील 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा (Dharavi corona positive patient death) आज रात्री कस्तूरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला 23 मार्चपासून सतत ताप येत होता. त्यामुळे 26 मार्च रोजी या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या रक्त तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा आज रात्री मृत्यू झाला (Dharavi corona positive patient death).

दरम्यान, मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या सात नातेवाईकांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. याशिवाय रुग्ण राहत असलेल्या इमारतीलाही सील करण्यात आलं आहे. धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे आज राज्यात 7 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 6 जण मुंबईचे आहेत. मुंबईत आज दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला (Dharavi slum area Corona Positive Patient)  आहे. आज (1 एप्रिल) दिवसभरात 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात 30 रुग्ण हे मुंबईतील असून दोन पुण्यातील आणि एक बुलडाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 335 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 181

पुणे – 38

पिंपरी चिंचवड – 12

सांगली – 25

नागपूर –  16

कल्याण – 10

नवी मुंबई – 8

अहमदनगर – 8

ठाणे – 8

वसई विरार – 6

यवतमाळ – 4

बुलडाणा – 4

पनवेल – 2

सातारा – 2

कोल्हापूर – 2

पालघर- 1

उल्हासनगर – 1

गोंदिया – 1

औरंगाबाद – 1

सिंधुदुर्ग – 1

रत्नागिरी – 1

जळगाव- 1

नाशिक – 1

इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 335

राज्यात आज एकूण 705 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 हजार 465 नमुन्यांपैकी 322 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 41 कोरोना बााधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात 24 हजार 818 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1 हजार 828 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च

मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च

*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*

मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च

मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च

नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू 26 मार्च

मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू 26 मार्च

बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च

मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च

पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च

पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

 

मागे

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा रुग्ण

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या साथीचा सर्वाधिक परिणा....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत : म
दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत : म

दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ (CM Uddhav Thackeray on Tablighi Jamaat Nizamuddin Event) झाली. महा....

Read more