By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 11:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : धुळे
औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनर ची निमगुल गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. यात 15 जण जागीच ठार झाले. तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहादा, दोंडाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात बसचा चक्काचुर झाला. बस आणि कंटेनरला दोन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. कंटेनरच्या धडकेने बस कापली गेल्याने मृतांमध्ये दोन्ही चालकांच्या वाहनांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना सहकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एसटीतर्फे मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ 10 हजार रुपये तर जखमींना 1 हजार रुपये देण्यात आले.
जम्मू काश्मिरात कलम 370 हटविण्यात आल्यानंतर तेथे इंटरनेट सेवा बंद करण्यात ....
अधिक वाचा