By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 27, 2021 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीमध्ये हिंसक वळण लागले. या हिंसाचारात अनेक शेतकरी तसेच पोलीससुद्धा जखमी झाले. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियारवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंसोबत अनेक प्रकारच्या अफवासुद्धा पसरवल्या जात आहे. अनेकांनी तर लाल किल्ल्यावरील देशाचा राष्ट्रीय ध्वज उतरवून तिथे खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकवल्याचा दावा केला आहे.
या दाव्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. लाल किल्ल्यावरील तिरंगा हटवून तिथे खलिस्तानवाद्यांचा झेंडा लावणे हा अपराध असून झेंडा लावणाऱ्यांना शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आंदोलकांनी खऱंच लाल किल्ल्यावरील तिरंगा झेंडा उतरवला?, तिरंगा उतरवून आंदोलकांनी कोणता झेंडा फडवकला?, या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे.
आंदोलनकांनी फडकवलेला झेंडा खलिस्तानवाद्यांचा नाही
दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवलेला झेंडा खलिस्तानवाद्यांचा नाही. तसेच ज्या ठिकाणी आंदोलकांनी झेंडा फडकवला तिथे तिरंगा झेंडा फडकवण्यात आलेला नव्हता. लाल किल्ल्याच्या लाहोर गेटवरील घुमटावर तिरंगा झेंडा फडकत असलेला व्हिडीओ स्पष्टपणे दिसतो आहे. भारतीय राष्ट्रध्वजाला आंदोलकांनी हात लावलेला नाही.
फडकवलेल्या झेंड्याला निशाण साहेब म्हणतात
आंदोलकांनी लाहोर गेटवर फडकत असलेल्या तिरंग्यापासून लांब आणखी एक झेंडा फडवला. हा झेंडा खलिस्तानवाद्यांचा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसा दावा अनेकांनी केला आहे. मात्र, तो झेंडा खलिस्तानवाद्यांचा नाही. फडकवण्यात आलेल्या झेंड्याला ‘निशाण साहेब’ म्हणतात. तसेच त्या झेंड्यावरील चिन्हाला ‘खंडा’ असं म्हटलं जातं. या झेंड्यामध्ये दोन कृपाण, दुधारी तलवार, आणि एक चक्र आहे.
सोशल मीडियावरील अफवा खोट्या
सोशल मीडियावर ज्या गोष्टी पसरवरल्या जात आहेत, त्या चुकीच्या असून आंदोलकांनी खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकवलेला नाही. तर शिख धर्मातील खालसा पंथाचा तो झेंडा होता.
दरम्यान, 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात 83 पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्कालीन बैठक बोलावून दिल्लीतील सुरक्षा वाढवण्याचा आदेश दिला आहे. या हिंसाचारास जबाबदार असणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेशही गृहमंत्रालयाने दिले आहेत.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून अनलॉक होण....
अधिक वाचा