ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांचं दान, कोण आहे सर्वांत मोठा दानवीर?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 23, 2024 11:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांचं दान, कोण आहे सर्वांत मोठा दानवीर?

शहर : देश

तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान... राम मंदिराच्या दान पेटीत कोट्यवधी रुपयांचं दान, 'या' व्यक्तीने केलंय सर्वांत जास्त दान, जाणून होईल आश्चर्य... भारतात सर्वत्र राममय वातावरण...

अयोध्या या ठिकाणी प्रभू राम तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. एकेकडे अयोध्या याठिकाणी प्रभू राण यांची प्राणप्रतिष्ठा होत होती, तर दुसरीकडे संपूर्ण भारतात उत्साहाचं आणि राममय वातावण झालं. अयोध्येत राम मंदिराची स्थपना करण्यासाठी फक्त भारतातून नाही तर, जगभरातून दार आलं आहे. भव्य मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 1100 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळत आहे. राम मंदिरच्या दानपेटीत देखील कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.

अयोध्या याठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रभू राम मंदिर यांच्या दान पेटीत तब्बल 3200 कोटी रुपयांचं दान जमा झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक उद्योजक आणि सेलिब्रीटींना राम मंदिरसाठी दान केलं आहे. पण सर्वात जास्त कोणी केलं असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल.

अंबानी-अदानी किंवा टाटा समूहासारख्या मोठ्या उद्योगपतींनी राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली असेलअसं तुम्हाला देखील वाटत असले. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी लोकांनी, सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, ऋषीमुनींनी देणग्या दिल्या. पण रिपोर्टनुसार सूरत याठिकाणी राहणाऱ्या एका उद्योजकाने मंदिरासाठी 101 किलो सोने दान केलं आहे.

हिरे उद्योजक दिलीप कुमार यांनी राम मंदिरासाठी सर्वात जास्त दान केलं आहे. दिलीप कुमार यांनी मंदिर ट्रस्टला 101 किलो सोने दान केलं आहे. दिलीप यांनी दिलेल्या गर्भगृह, खांब इत्यादी कामांसाठी सोन्याचा वापर करण्यात आला. सांगायचं झालं तर, सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 68 हजार रुपये आहे. म्हणजे दिलीप कुमार यांनी तब्बल 68 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

राम मंदिरासाठी दुसरी सर्वात मोठी देणगी कथाकार आणि अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दिली आहे. मोरारी बापूयांनी मंदिर ट्रस्टला 18.6 कोटी रुपये दान केलं आहे. रामायणाचा प्रचार करणाऱ्या मोरारी बापूंनी ही रक्कम लोकवर्गणीतून जमा केल्याची माहिती मिळ आहे.

मोरारी बापू यांनी भारतातून 11.30 कोटी रुपये, यूके आणि युरोपमधून 3.21 कोटी रुपये आणि अमेरिका, कॅनडामधून 4.10 कोटी रुपये जमा केले आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन मोरारी बापू यांनी केलं होतं.

डाबर इंडियाने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोठी घोषणा केली होती. 17 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील काही भाग श्री जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला दान करणार असल्याची घोषणा डाबर इंडियाने केली.

डाबर इंडिया नंतर ITC ने देखील मोठी घोषणा केली आहे. उद्घाटनाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागणारं धूप दान करण्याची घोषणा आयटीसीने केली आहे. यावेळ अनेक उद्योजकांनी राम मंदिरासाठी देणगी दिली आहे.

मागे

 राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने काय पाठवलं? अन्य राज्यांच योगदान, जाणून घ्या….
राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राने काय पाठवलं? अन्य राज्यांच योगदान, जाणून घ्या….

विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय, त्यावरुन पंतप्रधान नरे....

अधिक वाचा

पुढे  

पहिली पास व्यक्ती करतोय मराठ्यांचे सर्वेक्षण, मग कसे मिळणार आरक्षण…
पहिली पास व्यक्ती करतोय मराठ्यांचे सर्वेक्षण, मग कसे मिळणार आरक्षण…

मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूम....

Read more