ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात कोरोनाची दुसरी लाट येईल का? ICMR प्रमुखांनी दिले याचे उत्तर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 04, 2020 08:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात कोरोनाची दुसरी लाट येईल का? ICMR प्रमुखांनी दिले याचे उत्तर

शहर : मुंबई

कोरोनाव्हायरस संसर्गाची दुसरी लाट भारतात दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव (Dr Balram Bhargava) यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना साथीची दुसरी लाट भारतात येईल की नाही हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.दरम्यानन, डॉ. भार्गव निश्चितपणे म्हणाले की देशाच्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे वेळोवेळी संसर्गाच्या छोट्या लाटा दिसू शकतात. ते म्हणाले की परिस्थिती अतिशय वेगवान बदलत आहे. जगभरातील वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये संसर्ग आणि मृत्युदरात लक्षणीय भिन्नता आहेत.

'सार्स-सीओव्ही - एक विषाणू आहे, ज्याबद्दल आपल्याला अद्याप फारसे माहिती नाही. आम्ही भिन्न भौगोलिक प्रदेशांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण देखील पाहिले आहे. म्हणूनच, भारतात संसर्गाची दुसरी लाट येईल की नाही हे सांगणे कठीण आहे. विशिष्ट राज्यांत रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण खूपच भिन्न आहे, त्यामुळे ते एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

कोरोनाव्हायरस संसर्गाची  दुसरी लाट भारतात दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना साथीची दुसरी लाट भारतात येईल की नाही हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.दरम्यानन, डॉ. भार्गव निश्चितपणे म्हणाले की देशाच्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे वेळोवेळी संसर्गाच्या छोट्या लाटा दिसू शकतात. ते म्हणाले की परिस्थिती अतिशय वेगवान बदलत आहे. जगभरातील वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये संसर्ग आणि मृत्युदरात लक्षणीय भिन्नता आहेत.

'सार्स-सीओव्ही - ( ‘SARS-CoV-2 ) एक विषाणू आहे, ज्याबद्दल आपल्याला अद्याप फारसे माहिती नाही. आम्ही भिन्न भौगोलिक प्रदेशांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण देखील पाहिले आहे. म्हणूनच, भारतात संसर्गाची दुसरी लाट येईल की नाही हे सांगणे कठीण आहे. विशिष्ट राज्यांत रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण खूपच भिन्न आहे, त्यामुळे ते एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

तीन 'डी' सर्वात महत्वाचे आहेत

आयसीएमआर भविष्यात कोरोनासंबंधीच्या धोक्याचा सामना कसा करेल हे विचारले असता? भार्गव म्हणाले की, आयसीएमआरने यापूर्वीच दक्षिण-पूर्व आशियाई १० देशांसमवेत सहयोगात्मक संशोधनासाठी एक समान व्यासपीठ तयार केले आहे. निफा, झिकासारख्या आजारांशी लढताना आपण आघाडीवर आहोतकोणत्याही सार्वजनिक आरोग्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि हे लक्षात ठेवून तीन डी - डेटा, डेव्हलपमेंट, डिलिव्हरी ही महत्त्वाची भूमिका आहे आणि आपण पुढे जात आहोत. धोरण तयार करताना पुरावा शोधण्यासाठी आणि पुरावा-आधारित निर्णय घेण्यासाठी डेटा महत्त्वपूर्ण आहे.

चाचणीत आमचा क्रमांक चार

साथीच्या आजारापासून आयसीएमआर चाचणी क्षमतेत सातत्याने वाढत आहे. साथीच्या प्रादुर्भावाच्या वेळी, आम्ही दररोज १०० पेक्षा कमी चाचण्या करायचो आणि आज आपल्याकडे लडाखमध्ये १८,००० फूट उंचीवरील प्रयोगशाळांमध्ये दिवसाला लाखाहून अधिक नमुने तपासण्याची क्षमता आहे. चाचणीच्या बाबतीत, आम्ही ,०२,०२,८५८ चा आकडा पार केला आहे आणि जगभरात सर्वाधिक चाचण्या करणारा चौथा देश झाला आहे, असे डॉ. भार्गव म्हणाले.

तीन नवीन चाचणी सुविधा 

आयसीएमआरने अलीकडेच नोएडा, मुंबई आणि कोलकाता येथे अत्याधुनिक चाचणी सुविधा सुरू केल्या आहेत. ज्यायोगे चाचणी क्षमता वाढवता येईल. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांची जोखीम कमी होईल आणि वेळ कमी होईल. कोरोना साथीचा रोग नियंत्रित केल्यानंतर या केंद्रांचा उपयोग क्षयरोग, हिपॅटायटीस बी आणि सी, एचआयव्ही इत्यादीसारख्या इतर आजारांच्या चाचणीसाठी देखील केला जाऊ शकतो, असे डॉ. भार्गव म्हणाले.

 

मागे

Ganeshotsav 2020 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर
Ganeshotsav 2020 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर

अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या नि....

अधिक वाचा

पुढे  

तरुणाचं प्रसंगावधान,  सांताक्रूझ आग्रीपाडा मधील नाल्यातून वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला वाचवलं!
तरुणाचं प्रसंगावधान, सांताक्रूझ आग्रीपाडा मधील नाल्यातून वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला वाचवलं!

मुंबईतील सांताक्रूझमधील आग्रीपाडा  वाकोला परिसरात नाल्यातून वाहून जाणा....

Read more