By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 06:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : surat
हीर्यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या गुजरातमधील सूरतलाही मंदीची झळ बसू लागली आहे. वर्षभरात येथील हीर्यांच्या 1 हजाराहून अधिक कंपन्या बंद पडल्यामुळे 15 हजाराहून अधिक कारागीर बेरोजगार झाले आहेत. साहजिकच सूरतमध्ये स्थानिक झालेले अनेक कारागीर आपापल्या गावी परतत आहेत.
सुरतचा हीरे व्यापार जगभर प्रसिद्ध आहे. येथे जगातील 10 पैकी 9 हीरे तयार होतात. देश विदेशातील लोक हिर्याच्या व्यापारासाठी सूरत मध्ये येतात. या उद्योगामुळे लाखो कारागिरांचे संसार चालतात. मात्र अमेरिका चीन दरम्यान सुरू असलेल्या 'ट्रेड वॉर चा परिणाम या उद्योगावरही जाणवतोय. त्यामुळे हे उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षभरात अनेक छोटे मोठे सुरत मधील हीर्यांच्या कंपन्या बंद पडल्या. 1500 हीरे व्यापारीही बेरोजगार झाले आहेत. हीर्यांच्या एका कंपनीत सुमारे 200 कारागीर काम करतात . हे लक्षात घेतले तर 1 हजार कंपन्या बंद पडल्याने 15 हजार कारागिर बेरोजगार झाले आहेत, हे स्पष्ट होते.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी तुतारी एक्सप्रेसच्या वेळेत 22 ऑगस्ट ते 10 सप्�....
अधिक वाचा