ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 19, 2019 01:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

शहर : पुणे

पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने जात असणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक जेसीबी घुसल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर जवळपास 15 वारकरी जखमी झाले. दिवेघाट येथे हा अपघात झाला. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर हडपसरमधील नोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये संत नामदेव महाराज यांच्या 17 व्या वंशजांचाही समावेश आहे. त्यामुळे वारकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

सोपान महाराज नामदास हे संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज आहेत. पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या या दिंडीत त्यांच्यासह अनेक वारकरी सहभागी होते. दरम्यान अचानक उतारावरुन येणारा जेसीबी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. सकाळी 8 वाजता ही घटना घडली. मृतांमध्ये अतुल महाराज आळशी यांचाही समावेश आहे. ते आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते.

अपघातानंतर ... बंडा तात्या कराडकर हे स्वतः नोबेल हॉस्पिटलमध्ये पोहचून जखमींच्या उपचाराकडे लक्ष देत आहेत. दरवर्षी आळंदी येथे होणारा ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याला पंढरपूरहून येणाऱ्यांमध्ये संत नामदेव महाराजांची पालखी देखील असते. या पालखीत सुमारे 2 हजार वारकरी सहभागी होत पायी प्रवास करतात. यावर्षी देखील ही पालखी सासवडहून पुणे मुक्कामाला निघाली असताना दिवे घाटात ही घटना घडल्याची माहिती बंडातात्या कराडकर यांनी दिली.

बंडा तात्या कराडकर म्हणाले, “नामदेव महाराज पालखी दिवे घाटातून बरीच पुढे आली होती. त्याचवेळी उतरावरुन येणाऱ्या जेसीबीवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट दिंडीत घुसला. त्यामुळे 15 ते 20 वारकऱ्यांना गंभीर दुखापत झाल्या. यात दुर्दैवाने संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज सोपानकाका नामदास यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत अकोला जिल्ह्यातील जोग शिक्षण संस्थेतील मुलाचाही जागीच मृत्यू झाला.”या अपघाताने वारकरी संप्रदायावर मोठं संकट ओढावलं आहे. असं असलं तरी वारकरी संप्रदाय नियमांप्रमाणे चालणारा पंथ आहे, असंही बंडा तात्या कराडकर यांनी नमूद केलं.

वारकऱ्यांकडून वारंवार पोलीस बंदोबस्ताची मागणी, प्रशासनाचं दुर्लक्ष

वारकऱ्यांनी मागील मोठ्या कालावधीपासून दिंडीदरम्यान पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी आम्ही पोलीस विभागाला अर्ज विनंत्या करतो. मात्र, त्यांच्याकडून याची म्हणावी अशी दखल घेतली जात नाही. आषाढीला जो ज्ञानोबांचा सोहळा चालतो त्यात 3 लाखांहून अधिक वारकरी असतात. त्यामुळे पोलीस प्रशासन त्याची दखल घेतं. आत्ताच्या सोहळ्याकडे दुर्लक्ष होतं, असं मत बंडा तात्या कराडकर यांनी व्यक्त केलं.

पालखी सोहळ्याची पार्श्वभूमी

या सोहळ्यासाठी प्रतिवर्षी कार्तिक पोर्णिमेला पालख्या निघतात. आळंदीला वद्य अष्टमीला म्हणजे नवव्या दिवशी पोहचतात. या प्रमाणे यंदाही हा पालखी सोहळा पोर्णिमेला (12 नोव्हेंबर) निघाला. मुक्काम करत 18 नोव्हेंबरला पालखी सासवडला मुक्कामी थांबली. सासवडवरुन पालखी पहाटे 4 वाजता पुढील प्रवासासाठी निघाली. सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात होती. त्याचदरम्यान ही घटना दिवे घाटात घडली.

मागे

टेलिकॉममधील संकटाचा परिणाम आता सामान्य ग्राहकांवर,१ डिसेंबरपासून नवीन दर
टेलिकॉममधील संकटाचा परिणाम आता सामान्य ग्राहकांवर,१ डिसेंबरपासून नवीन दर

टेलिकॉममधील संकटाचा परिणाम आता सामान्य ग्राहकांवर होणार आहे. देशातील टेलि....

अधिक वाचा

पुढे  

मराठा आरक्षणाविरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता पुढील वर्षी
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता पुढील वर्षी

शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण वैध ठरवण्याच्या मुं....

Read more