By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज आपण ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. त्याच प्रमाणे जगात ह्या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. आजच्या दिवशी काय काय दिनविशेष आहेत ? जाणून घेऊया.
घटना :
१५१९: पनामा सिटी शहराची स्थापना झाली.
१६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्यांदा) पराभूत केले.
१८२४: अमेरिकेतील गुलामगिरी पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९१४: पनामा कालव्यातून एस. एस. अॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.
१९२९: संशोधक ग्राफ झेपेलिन हे बलून मधून जगप्रवासासाठी रवाना झाले.
१९४७: भारत देश स्वतंत्र झाला.
१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.
१७६९: फ्रान्सचा सम्राट नेपोलिअन बोनापार्ट यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १८२१ – सेंट हेलेना)
१७९८: भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८३१)
१८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)
१८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)
१८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)
१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)
१९०४: मोटार व्हीलचेअरचे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)
१९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)
१९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)
१९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)
१९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.
१९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.
१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.
१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.
१९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.:
१९३५: अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स यांचे निधन.
१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)
१९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)
देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तिन्ही सैन्य दलांमध्ये अधिक सुसूत्रता आणण....
अधिक वाचा