By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 08:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
महाराष्ट्रात एकीकडे महापूर आहे म्हणून माणसं चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे पाणी नाही म्हणून त्रस्त आहेत. आणि ह्याच पाणी प्रश्नावर तोडगा निघत नाही. प्रशासनाचं लक्ष नाही म्हणून मराठी कलाकार रस्त्यावर उतरले आहेत.
नगरमधील 35 गावांच्या पाणी योजनेला मंजूरी देण्याचं आश्वासन लोकसभा निवडणुकीत देऊनही अद्यापही योजना मंजूर न झाल्याने 35 गावातील पाणी प्रश्नावरून अभिनेत्री दीपाली सय्यदने अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केल आहे. 9 ऑगस्टपासून हे उपोषण सुरू केल आहे. ही योजना सुरू व्हावी यासाठी दीपालीने मोठा लढा उभारला आहे. गावकर्यांचा पाठींबाही मिळविला आहे. मात्र प्रशासन स्तरावर अजूनही काही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही.
अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्यातील साकलाई उपसा सिंचन योजनेतून 35 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. गेल्या 20 वर्षापासून ही योजना प्रलंबित आहे. अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई ह्या प्रश्नासंदर्भात न झाल्याने उपोषणाला बसत असून हा प्रश्न निकाली लागे पर्यंत उपोषण चालू राहणार आहे असे दीपालीने सांगितले .
मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी, सायली पराडकर यां कलाकारांनीही उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
मुसळधार पावसामुळे आलेल्या महापूराच्या पाण्याचा विळखा ६ व्या दिवशीही कोल्....
अधिक वाचा