ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिनेत्री दीपाली सय्यदचं उपोषण मागे

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 03:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिनेत्री दीपाली सय्यदचं उपोषण मागे

शहर : अहमदनगर

अहमदनगर मधील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यदने उपोषण मागे घेतले. साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू करावे या मागणीसाठी ९ ऑगस्ट पासून दीपाली सय्यद उपोषण करीत होत्या. या योजनेचा श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना फायदा होणार आहे.

दीपाली सय्यद उपोषणाला बसल्याचे कळताच अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्याशी संवाद साधून शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर राम शिंदे यांनी दीपाली यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क  साधून दिला.तेव्हा याबाबतच्या बैठकीसाठी दीपाली व संबंधित समितीला त्यांनी बोलावले. तर पालकमंत्री राम शिंदे यांनी त्यासाठीचा पाठपुरावा करीत जी काही मदत लागेल ती करण्याचे आश्वासन दिले. अखेर राम शिंदे यांच्याशी सफल चर्चा होताच दीपाली सय्यद यांनी पाणी पिउन  उपोषण सोडले.

मात्र येत्या १ सप्टेबर पर्यंत याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर २ सप्टेंबर पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला आहे.

 

मागे

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांना त्यांच्या जन्मशताब्दी ....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेना शाखा क्रं ८८ तर्फे   भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न
शिवसेना शाखा क्रं ८८ तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न

सांताक्रूझ (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आग्रीपाडा येथे शिवसे....

Read more