ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाशिकमध्ये शासनाच्या सहकार पुरस्काराचे वितरण

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशिकमध्ये शासनाच्या सहकार पुरस्काराचे वितरण

शहर : नाशिक

 सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या वैभवासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे आवश्यक असून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करावेअसे आवाहन सहकारमदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी  केले.

महाराष्ट्र शासनाच्या सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे आयोजित सहकार पुरस्कार 2017-18 वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार भारती पवारआमदार देवयानी फरांदेसीमा हिरेसहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनीपणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवालराज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीचे सदस्य अविनाश महागावकरविभागीय सहनिबंधक (लेखा परीक्षण) आर.सी.शाह आणि जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे  आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणालेसहकार समृद्ध झाल्याशिवाय राज्य समृद्ध होणार नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना राजकीय विचार बाजूला सारून संस्था मोठी करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. राज्यातील 50 टक्के लोकसंख्या सहकार क्षेत्राशी जोडली गेली असली तरी सामान्य शेतकरी आणि समाजातील प्रत्येक घटक सहकाराशी जोडला जायला हवा. त्यासाठी इतर संस्थांनी चांगल्या संस्थांचा आदर्श घ्यावा. शेतकरी सभासदांना संस्थेच्या माध्यमातून कसे सहकार्य करता येईल याचा विचार करावा. संस्थास्तरावर चर्चा करून आपले प्रश्न सोडवावेत. पारदर्शक कारभार केला तर तक्रारी कमी होऊन ग्राहकांचे हित साधता येईल.

सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करताना अडचणीतील संस्थांना मदत करण्यात येत आहे. ई-नामाच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न होत आहे. 3500 विविध कार्यकारी संस्थांनी शासनाची मदत न घेता स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. अशा संस्थांनी तयार केलेला माल मॉलमधून विकण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. सहकाराच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि बचत गटांनादेखील उन्नतीसाठी सहकार्य करावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गावातला तरुण आणि पैसा गावातच राहण्यासाठी विविध कार्यकारी संस्था मजबूत करणे व त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे. पुरस्कारप्राप्त संस्थांनी एकेक संस्था दत्तक घेऊन त्या संस्थेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावाअसे आवाहनदेखील श्री.देशमुख यांनी केले. राज्याच्या अनेक भागात पुरामुळे नुकसान झाले असून या भागातील जनतेचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढे यावे व मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावेअसे त्यांनी सांगितले.

सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि कामकाज कार्यक्षमपणे करण्यासाठी डिजीटलायझेशनवर भर देण्याची  गरज असल्याचे श्री. महागावकर यांनी सांगितले. सहकारात युवकांचा सहभाग वाढण्यासाठी विविध संस्थांना मिळालेले पुरस्कार प्रेरणादायी ठरतीलअसे ते म्हणाले.

प्रास्ताविकात श्री.सोनी म्हणालेराज्यातील 2 लाख सहकारी संस्थांच्या कामकाजात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कामकाजात आधुनिक व्यवस्थापन आणण्यासाठी 10 संस्थांची प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा 50 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंत्री श्री.देशमुख यांच्या हस्ते 'सहकार गौरवस्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या हस्ते सहकार महर्षीसहकार भूषण आणि सहकार निष्ठ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्ञानदीप को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विक्रोळी (पु.) मुंबई या संस्थेला एक लाखाचा सहकार महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेने सांगली आणि कोल्हापूर येथील महापूरात क्षतीग्रस्त झालेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.

बॅसिन कॅथॉलिक सहकारी बँक पालघरतर्फे 30 लाखमाळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती 31 लाख 51 हजारसाई सेवा ग्रामीण बिगरशेती शेतकरी सहकारी पतसंस्था श्रीगोंदा 5 लाख 55 हजारअभिनंदन बँक एक लाखसटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी संस्थेने 25 हजार आणि भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणेने 25 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहकार मंत्र्यांकडे सुपुर्द केला.

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थानागरी व पगारदार नोकरांच्या पतसंस्थाजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकनागरी सहकारी बँकसहकारी साखर कारखाने/सूत गिरण्या/ जिल्हा दूध संघगृहनिर्माण सहकारी संस्थाऔद्योगिकहातमाग व यंत्रमागउपसा सिंचन व इतर संस्थाफळे-भाजीपाला खरेदी विक्री प्रक्रिया संस्था आणि प्राथमिक दूध उत्पादनकुक्कुटपालनमत्स्यपालन व पशुसंवर्धन संस्था अशा नऊ गटात खालील संस्थांना सहकार महर्षीसहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सहकार भूषण पुरस्कार- 51 हजार रुपये व प्रशस्तीपत्र : - प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था - पुणे विभाग - अरुण विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या.चंदूर ता.हातकणंगले जि.कोल्हापुर. कोकण विभाग- नाटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.नाटे ता.राजापूर जि.रत्नागिरी.

नागरी पतसंस्था ग्रामिण बिगरशेती पतसंस्था पगारदार नोकरांच्या पतसंस्था:- कोकण विभाग- श्री.निनाईदेवी सहकारी पतसंस्था मर्या. मस्जिदमुंबई-03 नाशिक विभाग- साईसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर. पुणे विभाग- दि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑपक्रेडीट सोसायटी जि.ता.करवीरजि.कोल्हापूर.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक : - कोकण विभाग- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी,

नागरी सहकारी बँका - कोकण विभाग- बॅसिन कॅथॉलिक को-ऑप बँक लि.वसई ता.वसई जि.पालघरअमरावती- अभिनंदन अर्बन को-ऑप बँक मर्या.अमरावती जि.अमरावती.

सहकारी साखर कारखाने/सहकारी सूत गिरण्या/जिल्हा दूध संघ : पुणे विभाग - दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि.माळेगांव बु.(शिवनगर) ता.बारामती जि.पुणे. औरंगाबाद- विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या.विलासनगर ता.जि.लातूर.

गृहनिर्माण सहकारी संस्था: कोकण विभाग- नवमिलन को.ऑप हौ.सोसायठी लि.डोंबिवली पूर्व.जि.ठाणे व जलाराम पार्क हौसिंग सोसायटी लि.भांडूप (प.) मुंबई.

फळे भाजीपाला खरेदी विक्रीप्रक्रिया व ग्राहक संस्था: पुणे- हातकणंगले तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.पेठवडगांव ता.हातकणंगले जि.कोल्हापूर नाशिक - प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था मर्या.लोणी खुर्द ता.राहता जि.अहमदनगर

प्राथमिक दूध उत्पादक कुक्कुटपालनमत्स्यपालन व पशुसंवर्धन संस्था: पुणे- सहकार महर्षि हणमंतराव दि.पवार सहकारी कुक्कुटपालन सोसायठी लि.फलटण ता.फलटण जि.साताराकोकण- महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ मर्या.मुंबई , मांडवी कोळीवाडा मस्जिद बंदर (प.) मुंबईनाशिक- सिद्धेश्वर सहकारी दूध उत्पादक व्यावसायिक संस्था मर्या.अकोले ता.अकोले जि.अहमदनगर.

 

पुढे  

अभय योजना 2019 अंतर्गत 3 हजार 500  कोटी रुपयांचा कर भरणा - सुधीर मुनगंटीवार
अभय योजना 2019 अंतर्गत 3 हजार 500  कोटी रुपयांचा कर भरणा - सुधीर मुनगंटीवार

वस्तू आणि सेवा कर विभागाने अंमलात आणलेल्या अभय योजना 2019 अंतर्गत विवादित कर,&nb....

Read more