By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 10:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पतीने फोनवरून तलाक दिल्यानंतर दादरच्या दंडाधिकारी न्यायालयाने फोनवरून दिलेला तलाक वैध नाही, असे म्हणत शिवडीच्या एका मुस्लीम महिलेला नुकताच दिलासा दिलाय.. तर, न्यायालयाने या महिलेच्या इंजिनीअर पतीला एक लाख रुपये नुकसानभरपाई आणि दरमहा देखभालीचा खर्च म्हणून १० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या महिलेने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दादर दंडाधिकारी न्यायालयात २०१४ मध्ये तक्रार केली होती. पतीने फोनवरून तलाक दिल्यानंतर एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रारी करण्यात आल्या. महिलेने पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पती आणि सासरचे मारहाण करतात, असा आरोप तिने केला. पतीच्या वकिलांनी आरोप फेटाळत न्यायालयाला सांगितले की, इद्दत म्हणून पत्नीला ९ हजार रुपयांचा धनादेश दिला. न्यायालयाने पत्नीच तलाक देण्याचा आग्रह करत होती, हा पतीचा युक्तिवाद फेटाळला आहे.
घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला चव्हाण याना मालिका पाहताना जेवण करणं चा....
अधिक वाचा