By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 09:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : kalyan
कोरोना काळात आरोग्याच्या इतर बाबींकडे सर्वसामान्यांचे दुर्लक्ष होता कामा नये. कोरोनाचे संकट मोठे आहेच, पण त्याचसोबत अनेकांना इतर छोट्या-मोठ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. पण कोरोनाला घाबरून बहुतांशजण दवाखान्यात किंवा रुग्णालयात जात नाहीत, परिणामत: भविष्यात त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जे अधिक नुकसानकारक होऊ शकते, म्हणून आम्ही या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन ठिकठिकाणी करत आहोत, असे प्रतिपादन ‘सक्षम भारत’चे राष्ट्रीय समन्वयक तथा प्रसिध्द समाजसेवक बी. शामराव यांनी केले. कल्याणमध्ये आयोजित ‘मोफत आरोग्य शिबिर’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
सक्षम भारत, स्काय फाऊंडेशन, संघर्ष मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील काटेमानेवली, गोपाळकृष्ण परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील सुमारे 200 हून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजन मात्रा, ईसीजी, रक्तदाब तथा मधुमेह तपासणी, दातांची तपासणी आदी करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन कोरोनामुळेची आवश्यक ती सर्व काळजी घेऊनच करण्यात आले होते.यावेळी बी. शामराव यांच्यासमवेत निलेश बनकर, उमेश वाघमारे, दीपक लोखंडे, दिवेश पगारे, अक्षय तोडणकर, कुणाल वायल, रोहित बनकर, शरद बनकर, किरण लांडे, सुशांत खरात, दीपक कांबळे, सनी बागुल आदींसह तिन्ही संघटनांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे . कोकण रेल्वेमार्गा....
अधिक वाचा