By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 07:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकांनी मास्क वापरू नये यासाठी अखिल भारतीय स्वास्थ्य अभियानाकडून मरीन ड्राईव्ह येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी एकत्र येत मास्क न घालताच आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुंबईकरांना मास्क फ्री जगू द्या, अशी मागणी मांडली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कोरोना एक फार्स आहे. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. यामाध्यमातून लोकांची मोठी फसवणूक होत आहे. लोकांना घाबरवलं जात आहे. लोक घाबरतात आणि त्यामुळे मास्क वापरतात. परंतु सतत मास्क वापरल्याने कार्बन डायऑक्साईड हा वायू शरीरात जातो. त्यामुळे यकृत खराब होतं. कॅन्सरही होऊ शकतो. यकृत स्वस्थ ठेवण्यासाठी लोकांनी मास्क वापरणे बंद केले पाहीजे.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, घरगुती डाएटनेच कोरोनावर मात करता येईल. परंतु लोकांच्या मनात भीती पेरून आयटी कंपन्या आणि अमेरिकेसारखे देश स्वहित पाहत आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, आपल्याला पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही. कोरोनावरील लस, मास्क, कॅशलेस सेवा यापैकी कशाचीही गरज नाही.
जर मास्कने कोरोनाला रोखता येतं तर मग सहा फुटांपर्यंतचं फिजिकल डिस्टन्स कशाला? फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनापासून बचाव करता येत असेल तर मास्क कशाला? मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनाला रोखता येत असेल तर लॉकडाऊनची गरज काय? मास्क फिजिकल डिस्टन्स आणि लॉकडाऊन या तिन्ही गोष्टी कोरोनाला थोपवू शकतात तर मग लस कशाला हवी? असे अनेक प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.
हाथरस प्रकरणात योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. एसपी, डीएसपी आणि हाथरसचे न....
अधिक वाचा