ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Corona new symptoms | कोरोनाची तीन नवी लक्षणे, पाठदुखीचाही समावेश : डॉ. जलील पारकर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 02:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Corona new symptoms | कोरोनाची तीन नवी लक्षणे, पाठदुखीचाही समावेश : डॉ. जलील पारकर

शहर : मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि ज्यांनी स्वत: कोरोनावर मात केली आहे, त्या डॉक्टर जलील पारकर यांनी कोरोनाच्या नव्या लक्षणांचं निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोनाच्या नव्या लक्षणात पाठदुखी, उलटी आणि अतिसार या लक्षणाचाही समावेश झाला आहे. ही लक्षणे असणाऱ्या व्यक्ती कोरोनाबाधित असू शकते, असं डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितलं. याशिवाय कोरोनामध्ये प्रामुख्याने घसा दुखणं, पाठ दुखणं, अंग दुखणे ही महत्त्वाची लक्षणे दिसतात, असंही डॉक्टर जलील पारकर म्हणाले.

मुंबईतील ख्यातनाम डॉक्टर अशी जलील पारकर यांची ओळख आहे. डॉक्टर पारकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे डॉक्टर म्हणून परिचित आहेत.

पल्मॉनॉलॉजिस्ट डॉ. जलील पारकर हे कोरोना रुग्णांवर उपचार करताना, त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय त्यांच्या पत्नीलाही संसर्ग झाला. डॉ. जलील पारकर हे पाच दिवस आयसीयूमध्ये होते. त्यांनी कोरोनावर मात केली.

डॉ. पारकर यांना कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही नवी लक्षणे आढळली आहेत. यामध्ये पाठदुखी, उलटी आणि अतिसार यांचा समावेश आहे. घसा दुखणं, पाठ दुखणं, अंग दुखणे ही लक्षणे यापूर्वीच आढळलेली आहेत.

अमेरिकेच्या संस्थेने नोंदवलेली तीन लक्षणे

आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, कोरडा खोकला, थकवा येणं ही कोरोनाची लक्षणे मानली जात होती. मात्र, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या वैद्यकीय संस्थेने कोरोनाची आणखी तीन नवी लक्षणे सांगितली होती. यामध्ये सतत नाक गळणे, मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे आणि अतिसार यांचा समावेश होता.

आतापर्यंत दिसलेली कोरोनाची लक्षणे

1. ताप किंवा थंडी वाजणे

2. खोकला

3. श्वास घेण्यास त्रास होणे

4. थकवा येणं

5. स्नायंमध्ये दुखणे

6. डोकेदुखी

7. चव न कळणे किंवा वास न येणे

8. घशात त्रास होणे किंवा घसा खवखवणे

9. सतत नाक वाहणं

10. मळमळ किंवा अस्वस्थ वाटणं

11. अतिसार किंवा जुलाब

12. पाठदुखी

13. उलटी

मागे

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ

आजपासून काही बदल होत आहेत. परंतु या बदलांच्या दरम्यान, सर्वात मोठा झटका हा स....

अधिक वाचा

पुढे  

पतंजलीच्या कोरोनीला अखेर सरकारची मान्यता, पण ...
पतंजलीच्या कोरोनीला अखेर सरकारची मान्यता, पण ...

पतंजलीच्या कोरनिल या औषधाला अखेर मोदी सरकारची मान्यता मिळाली आहे. मात्र हे ....

Read more