ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉ. पल्लवी बनसोडे, वैशाली आहेर यांना “स्वयंसिद्धा पुरस्कार” जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉ. पल्लवी बनसोडे, वैशाली आहेर यांना “स्वयंसिद्धा पुरस्कार” जाहीर

शहर : पुणे

प्रतींनिधी- अनुज केसरकर -: स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलन चिंचवड पुणे येथील प्रतिभा महाविद्यालय येथे रविवार २२ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका विनिता ऐनापुरे या असून, प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी निवृत्त पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव डॉ. राजेंद्र कांकरिया आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी साहित्य, कला, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनास्वयंसिद्धा पुरस्कार २०१९ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहेसाहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी डॉ. पल्लवी बनसोडे पत्रकारितेसाठी वैशाली आहेर यांचा समावेश आहे.

दुसऱ्या सत्रातमहिला शिक्षण पुरोगामी विचार या विषयावर चर्चासत्र होईल. संमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातून साहित्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. विनामूल्य असलेल्या या संमेलनामध्ये रसिकांनी आवर्जून सहभागी व्हावे,असे आवाहन स्वयंसिद्ध प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले आहे.

मागे

कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली
कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली

            मुंबई - महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्....

अधिक वाचा

पुढे  

पालिका नव्याने बांधणार ११ धोकादायक पूल
पालिका नव्याने बांधणार ११ धोकादायक पूल

           मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीसाठी ‘हद्दीत वा....

Read more