By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 04:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
मॅगसेसे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेंडलने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार बिल गेट्स यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. रविवारी 17 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यासह हा पुरस्कार डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा 17 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील आयसीएमआर हॉलमध्ये संध्याकाळी होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या दुर्गम भागात डॉ प्रकाश आमटे आदिवासींकरता कार्यरत आहेत. लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आमटे कुटुंबियांच आरोग्यसेवेचं कार्य सुरू आहे. आमटे दाम्पत्याला या अगोदर मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानं 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' (डी.लिट)या पदवीने देखील गौरविण्यात आलं आहे.
केईएम रुग्णालयात एका डॉक्टराने आत्महत्या केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच ....
अधिक वाचा