By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 03:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
सौदी अरेबियाच्या तेल पाईप लाईनवर मंगळवारी ड्रोन द्वारे हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तसेच पार्शियन आखाताजवळ सौदीच्या दोन तेलवाहू जहाजांवरही हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या सार्या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या उपलब्धतेची तसेच त्याच्या भावाची स्थिती दोलायमान झाली आहे. तेलाचा भाव आता आणखी एक डॉलरने वाढून तो 71 डॉलरवर गेला आहे.
सौदी अरेबियाच्या तेल समृद्ध पुर्व प्रांतातून लाल समुद्राकडे जाणार्या या पाईपलाईनवर हा ड्रोन हल्ला झाला आहे. त्यामुळे ही पाईपलाईन सध्या बंद ठेवावी लागली आहे. तथापी आम्ही तेलाचे उत्त्पादन आणि त्याच्या निर्यातीवर या घटनांचा विपरीत परिणाम होऊ देणार नाही असा निर्धार सौदीचे उर्जा मंत्री खलित अल फलिह यांनी म्हटले आहे. सौदी सरकारच्या विरोधात तेथील हौथी बंडखोर लढत असून त्यांनीच हा ड्रोन हल्ला केल्याचे सांगण्यात येते. स्वता हौथी गनिमांनी म्हटले आहे की आम्ही सौदीतील तेल वाहिन्यावर सात ड्रोन हल्ले केले आहेत. याचा अधिकचा तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही.
प्रेयसीसोबत तिच्या घरी नको त्या अवस्थेत असलेल्या तरूणाला महिलेच्या नवर्....
अधिक वाचा