ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठवाड्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 03:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठवाड्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

शहर : औरंगाबाद

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कहर केल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र असताना मराठवाड्यातील शेतकरी मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जोरदार पावसामुळे नाशिकची गोदावरी मात्र मराठवाड्यावर प्रसन्न झाली आहे. असे असले तरी दुष्काळाचे ढग कायम आहेत. शेतीसाठी पावसाची गरज आहे.

उस्मानाबाद मध्ये सरासरीच्या 29 टक्के पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले. जिल्ह्यात अजून 219 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 56 चारा छावण्यामध्ये 30 हजार जनावरे अजूनही आश्रित आहेत. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या नजराही आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने पीकं सुकून गेली आहेत. बीड,लातूरची अवस्थाही गंभीर आहे. लातूर ला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.

 

मागे

सांगलीत बोट बुडून झालेल्यापैकी दुर्घटनेत 9 जणांचे मृतदेह सापडले
सांगलीत बोट बुडून झालेल्यापैकी दुर्घटनेत 9 जणांचे मृतदेह सापडले

सांगली-कोल्हापुरात मुसळधार पावसाने थैमान मांडले असून पूरापासून नागरिकांच....

अधिक वाचा

पुढे  

अलमट्टीमधून कर्नाटक सरकार ५ लाख क्युसेक पाणी सोडणार
अलमट्टीमधून कर्नाटक सरकार ५ लाख क्युसेक पाणी सोडणार

कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा कर्नाटकमधील अलमट्टी धरण कारणीभूत ....

Read more