ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 03, 2021 01:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

शहर : देश

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे.  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया  DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून आज परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे.

कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराबाबतच्या संमतीसाठी तज्ज्ञ समितीनं शिफारसही केली होती.  कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती.

DCGI शी संलग्न अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडून जेव्हा कोणत्याही औषधास मान्यता मिळते, तेव्हा त्या कंपनीला CT23 अर्थान परवानगी मिळते. ज्यानंतर औषधाची निर्मिती ज्या राज्यात केली जात आहे ते राज्य स्टेट ड्रग रेगुलेटरी अथॉरिटीकडे जाऊन ड्रग एंडोर्समेंटची मागणी करतं. ज्यानंतर हे औषध रोल आऊट होतं. या प्रक्रियेसाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

देशात लवकरच सुरु होणार कोरोना लसीकरण

सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी अर्थात तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनंतर आता डीसीजीआयच्या या घोषणेनं मोठा दिलासा मिळाला आहे. आता या दोन्ही लसींच्या निर्धारित आपात्कालीन वापराला परवानगी मिळताच भारतात तातडीनं कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

अफवांना बळी पडू नका- केंद्रीय आरोग्यमंत्री

भारतात जगभरातील सर्वात मोठ्या लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच अनेक अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. पण, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे.

मागे

ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट: सोमय्या
ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट: सोमय्या

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी एक खळबळजनक आरोप के....

अधिक वाचा

पुढे  

SSC-HSC EXAM | विद्यार्थ्यांना दिलासा, ‘या’महिन्यात होणार दहावी-बारावीच्या परीक्षा
SSC-HSC EXAM | विद्यार्थ्यांना दिलासा, ‘या’महिन्यात होणार दहावी-बारावीच्या परीक्षा

दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच....

Read more