By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 10:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जालना
देशात कोरोनाच्या (coronavirus) लसीकरणाची (corona vaccination) ड्राय रन सुरू झाली आहे. पुणे, नागपूर, नंदुरबार आणि जालनामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह प्रात्यक्षिके सुरु झाली आहेत. राज्यात पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्रायरन (Covid-19 vaccine dry run) सुरु झाली आहे. जालन्यात महिला कर्मचाऱ्याने लस टोचून घेतली. आपल्याला याचा काहीही त्रास झाला नाही, अशी माहिती या महिला कर्मचाऱ्याने लस (corona vaccin) टोचून घेतल्यानंतर स्पष्ट केले.
देशातील सर्वच राज्य आणि सर्व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आजपासून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरु झाली आहे. राज्यात पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्रायरन होत आहे. प्रत्यक्ष लस दिली जाणार नसली तरी लसीकरणावेळी करावी लागणारी सर्व सिद्धता, तयारी याची प्रॅक्टीस करण्यात आली.
जालन्यात कोरोना लसीचे ड्रायरन सुरू झाले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून रंगीत तालमीला सुरूवात झाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः ड्रायरनला उपस्थित होते. जालना जिल्ह्यात 3 ठिकाणी ड्रायरन होणार आहे. सकाळपासूनच शिस्तबद्धरित्या ड्रायरनला सुरूवात झाली आहे. या ठिकाणी एका महिला कर्मचाऱ्याने लस टोचून घेतली आहे.
नागपूरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह लसीकरणाचं प्रात्यक्षिक सुरु झाले असून डागा हॉस्पिटल आणि कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ड्राय रन सुरु झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. लसीकरणादरम्यान कोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारे लस द्यावी आणि नोंदणी पासून इतर प्रक्रिया याबाबत या प्रात्यक्षिकांमध्ये सराव करुन घेण्यात येत आहे. नागपूरच्या डागा हॉस्पिटल आणि कामठी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येत आहे.
भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. (India-UK ....
अधिक वाचा