ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’2 जानेवारीला होणार; ‘या’चार जिल्ह्यांची निवड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 01, 2021 08:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’2 जानेवारीला होणार; ‘या’चार जिल्ह्यांची निवड

शहर : मुंबई

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर 2 जानेवारीला होणार असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आली आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे.

लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील. महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदुरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

33 हजार व्यक्ती भारतात परतल्या, 114 कोरोना पॉझिटिव्ह

ब्रिटनहून एका महिन्यात 33 हजार व्यक्ती भारतात परतल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. या सर्व नागरिकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर टेस्ट कऱण्यात आल्या आहेत. त्यापैकी 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. 114 मध्ये 6 व्यक्तींच्या अहवालांमध्ये कोरोनाचा नवा घातक अवतार आढळला आहे.

कोरोना विषाणूचा नवा घातक अवतार ब्रिटनमध्ये समोर आला होता. तेव्हापासून कोरोनाचा नवा अवतार 19 देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्यामुळे जगामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लंडन आणि साऊथ इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लावत, ख्रिसमसच्या उत्साहावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर, भारतानं यूके आणि मध्य-पूर्वेतून येणाऱ्या विमान वाहतूकीवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे.

कोरोनाच्या SARS-COV-2 नव्या अवताराला “VUI-202012/01” किंवा B.1.1.7, असं म्हटलं गेलं आहे. हा विषाणू पूर्वीच्या विषाणूच्या तुलनेत वेगानं संक्रमित होतो. यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संसर्गाची तीन प्रमुख लक्षण आढळून आली आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, वास येणे याचा समावेश आहे.

मागे

सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही : देवेंद्र फडणवीस
सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही : देवेंद्र फडणवीस

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची CISF च्या महासंचा....

अधिक वाचा

पुढे  

सौरभ गांगुलीला दिलेली जमीन परत घेणार, ममता सरकारकडून प्रक्रिया सुरु
सौरभ गांगुलीला दिलेली जमीन परत घेणार, ममता सरकारकडून प्रक्रिया सुरु

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची भाज....

Read more