By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 01:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मंदीने अवघ्या देशाचा आलेख गडगडला असून दिवसेंदिवस राज्यातील बेरोजगारीच्या समस्या वाढत आहेत. या आर्थिक वर्षात तब्बल १६ लाख नोक-या कमी झाल्याचे चित्र उघडकीस आले आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (एसबीआय) तयार केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षात आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिसासारख्या राज्यांमधून पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रात मजुरीसाठी जाणा-या आणि हातावर पोट भरणा-या मजुरांसाठी पैसे पाठवण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हे लक्षात येताच कळते की, मजुरांची संख्या किती घटल्याचे प्रमाण आहे.
मागील वर्षी एकूण ८९.७ लाख नोक-यांची निर्मिती झाली होती. त्यातच सुरू असलेल्या आर्थिक वर्षात हे प्रमाण कमी होणार असल्याचे या अहवालात दिसून आले आहे. चालू वर्षात १५.८ लाख नोक-यांमध्ये मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांच्या नोक-या करणा-या युवकांना घरात बसावे लागणार असून या नोक-यांचे प्रमाण कमी होणार आहे.
जागतिक मंदीचा फटका उद्योगधंद्यांवर होत असून लाखो तरुणांना पोटावर पाय देत जगावे लागणार असल्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षांत तब्बल ३९ हजारांहून कमी संधी असणार आहे. त्यामुळे अगोदर पासून नोकरीचा शोध सुरू असलेल्या नोकरदार वर्गाला आता सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरावती- संपूर्ण भारतात बेरोजगारीने तरुणांच्या आत्महत्येचा व....
अधिक वाचा