By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 05:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
साखरेच्या गाठी तसेच साखरेच्या कड्याला बाजारात म्हणावा एवढा उठाव नसल्याने यंदाच्या गुढीपाडवा सणावर दुष्काळाचे सावट कायम आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्ताने साखरेपासून तयार झालेल्या गाठी, कडे हे पदार्थ विक्रीसाठी राहुरीच्या बाजारात दाखल झाले आहेत. यंदा शनिवारी पाडव्याचा सण आला आहे. पाडव्याचा सण व साखरेच्या गाठीकडे हे समीकरण ओळखले जाते.
राहुरीच्या बाजारात एक किलो गाठीचा भाव शंभर रूपये तर साखरेचे कडे पंचवीस रूपयांपासुन दहा रुपयांपर्यंत असे बाजारभाव होते. मागील वर्षी साखरेचे बाजारभाव २९०० रूपये क्विंटल झाले असताना पाडव्याला गाठीचे भाव १२० रूपये किलोपर्यंत जाऊन पोहचले होते.
आज साखरेचे बाजारभाव ३४०० रूपये क्विंटल असताना गाठीचे भाव १०० रूपये झाले आहेत. मात्र गुढीपाडव्याचा सण एक दिवसावर आला असताना देखील गाठी व कडे खरेदीला ग्राहक नसल्याने या सणावार दुष्काळाचे सावट कायम आहे.
तब्बल आठ दिवसांपासून बंद असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिला....
अधिक वाचा