By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सोशल मिडीयावरून प्रत्युत्तर देत प्रसिद्धीच्या झोतात असलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र, भाजपात प्रवेश केल्यापासून सोशल मिडीयावर टीकेचा धनी ठरत आहे. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी गंभीरने त्याचा डुप्लिकेट गाडीवर उभा केला होता आणि स्वत: त्याच एसी कारमध्ये बसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गंभीरवर टीका होत आहे.
पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाने गौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर त्याच्या विरोधात आपकडून आतिशी मार्लेना या उभ्या राहिल्या आहेत. आतिशींनी गौतम गंभीरवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्रे असल्याचा दावाही करताना त्याच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झालेली आहे. तसेच प्रचार पत्रकांवर पत्रकांची संख्या आणि मुद्रकाचे नाव न छापल्याचाही गुव्हा दाखल झालेला आहे. यापेक्षा गंभीर आरोप त्याच्यावर आतिशी यांनी गुरुवारी केला आहे.
जेट एअरवेजने 17 एप्रिलला त्यांची सर्व उड्डाणे बंद केल्यानंतर आता विमानतळाव....
अधिक वाचा