By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 08:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना दुर्गा मूर्तींच्या उंचीवर4 फुटांची मर्यादा आणली. राज्य शासनाने नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत परिपत्रक काढले. याचा फटका वाशिम जिल्ह्यातील मूर्तिकारांना बसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.
कोरोना विषाणूमुळे यावर्षीच्या उत्सवात सार्वजनिक रित्या स्थापन करण्यात येणाऱ्या दुर्गा मूर्तींची उंची 4 फुटा पेक्षा जास्त नसावी अशी अट घालण्यात आलीय. या निर्णयामुळे जिल्ह्यातील मूर्तीकारांजवळ असलेल्या दोन हजार ते तीन हजारांपेक्षा अधिक मूर्ती पडून राहणार आहेत.यामुळे जिल्ह्यातील मूर्तिकारांवर आर्थिक संकट ओढवणार असून त्यांच्या उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
नवरात्रोत्सवाच्या किमान 4 महिने आधी पासून मूर्तिकारांनी मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मूर्तिकारांचे काम अंतीम टप्प्यात आले असताना मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणणारे परिपत्रक शासनाने काढले आहे. यामुळे मूर्तिकारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. पुढील वर्षापासून पी.ओ.पी बनावटीच्या मुर्तीवर बंदी असल्याने यंदा बनविलेल्या मूर्तींचे काय करावे?, असा प्रश्न निर्माण झाल्याने परीपत्रकाबाबत फेरविचार व्हावा,अन्यथा शासनाने मूर्तिकारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
मराठवाडा आणि विदर्भातून दरवर्षी गणपती व दुर्गा मुर्तींची मोठया प्रमाणात मागणी व्हायची. यावर्षी एकाही मुर्तीची मागणी झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लहान मृर्ती वापरायचे बंधन घातल्याने मंडळांनी वाशिमकडे पाठ फिरवली आहे.
वाशिम शहरातील प्रसिध्द मुर्तीकार सुरेश जावळे आणि रमेश चिल्होरे हे गणपती व दुर्गादेवीच्या मूर्ती बनवण्याचे काम वर्षभर करतात. वाशिमच्या बालाजी कुस्ती मैदान येथे त्यांचा मोठा कारखाना आहे. ऐन वेळी गणेशोत्सवामध्ये व आता नवदुर्गा उत्सव तोंडावर आल्यावर मोठ्या मुर्तींना परवानगी नसल्याने मोठ्या मुर्तींचे काय करायचे? असा प्रश्न मुर्तीकारांसमोर पडला आहे.
कोरोना आणि शासनाच्या मुर्तीच्या उंचीच्या निर्बंधामुळे कुभांर समाजातील मुर्तीकार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँक व फायनान्स कंपनीकडून कर्ज व उधारीवर भांडवल उभे केले होते. चार फुटा पेक्षा जास्त उंचीच्या 500 ते 600 दुर्गादेवी मूर्ती तयार आहेत.परंतु, या मूर्तींची विक्री होणार नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे आणि उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न निर्माण झाल्याचे सुरेश जावळेंनी सांगितले.
राज्यात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच चालल....
अधिक वाचा