By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 25, 2020 04:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
अंकारा - तुर्कस्तानच्या पूर्वेकडील प्रांतामध्ये ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला. या दुर्घटनेत १८ जण ठार झाले असून, ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानच्या पूर्वेकडील एलाजिग प्रांतातील सिवरिस शहराच्या १० किमी क्षेत्रामध्ये भूकंपाचे ६० तीव्र धक्के जाणवले. ४०-४० सेकंदांच्या अंतराने हे धक्के जाणवले. भूकंपामुळे काही इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये ३० जण दबले गेले आहेत. भूकंपानंतर पुन्हा आफ्टरशॉकचे धक्के जाणवण्याच्या भीती आहे.
त्यामुळे नागरिकांना पडलेल्या इमारतींकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. इमारतींच्या ढीगा-यांखाली काही जण गाढले गेल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या भूकंपाचे झटके इराण, सिरिया आणि लेबनॉनमध्येही जाणवले आहेत.
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ कळमजे येथे एसटी बस पुलाव....
अधिक वाचा