By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पालघर
एकीकडे गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असतानाच काल रात्री 9.45 पासून मध्यरात्री दीड वाजेपर्यंत धुंडलवाडी, दापचरी, तलासरी, बोर्डी, डहाणू , बोईसर, कासा, झाई ते गुजरातच्या उंबरगाव पर्यंतच्या भागाला 7 ते 8 भूकंपाचे धक्के बसल्याने पालघरवासीय धास्तावले आहेत. काही ठिकाणी विज गायब झाली असल्याने स्थानिक रहिवाशी चिंताग्रस्त झाले आहे.
पालघर जिल्ह्यात मध्यरात्री 1 च्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आयएमडी ने दिली, तसे पाहिले तर रात्री 9.49 वाजता जिल्ह्यात 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर 12.33 ला 2.2 रिश्टर त्यानतर 3 मिनिटांनी 1.9 रिश्टर स्केल, 1.03 वाजता 3.8 रिश्टर स्केल, 1.06 ला व 1.12 ला असे 7 ते 8 भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेक स्थानिक रहिवासी घराबाहेर पडले. पण बाहेरही वीज गायब असल्याने सर्व अस्वस्थ होते.
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, भारतीय जनसंघाचे दीनदयाल उपाध्याय व डॉक....
अधिक वाचा