By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 05:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : along
अरुणाचल प्रदेशमध्ये मंगळवारी मध्यरात्री भूकंपाचे झटके जाणवले. मंगळवारी रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले असल्याचे सांगण्यात आले आहे. या भूकंपात कोणतीही जिवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. अमेरिकी भूगर्भ सर्वेक्षणने भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल असल्याचे सांगितले. भारतीय हवामान विभागानुसार भूकंपाचे केंद्र अलोंग जवळपास 40 किलोमीटर दक्षिण पूर्व आणि राज्याची राजधानी इटानगरच्या 180 किलोमीटर दक्षिण-पश्चिम भागात होते.राज्याचे पोलीस महानिर्देशक एस. के. वी. सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व अधिक्षकांना संपर्क करुन कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नुसकान झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तिबेटमध्येही 6.3 तीव्रतेचा भूकंप आला असल्याची माहिती मिळत आहे. अरुणाचल प्रदेशही 6.1 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला असल्याचे सांगण्यात येत आहे.नेपाळमध्ये 25 एप्रिल 2015 साली मोठा भूकंप आला होता. या भूकंपाने मोठी हानी झाली होती. या भूकंपात जवळपास 9000 लोकच मृत्यूमुखी पडले होते तर पाच लाखहून अधिक लोक बेघर झाले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या प....
अधिक वाचा