ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुखांचं नाव देणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुखांचं नाव देणार

शहर : मुंबई

       मुंबई- मुंबई-नागपुर समुद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव निश्चित केल्यावर आता अजून एका रस्त्याचं नामकरण होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गाला (इस्टर्न फ्री वे) माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देणार असल्याची सूचना दिली आहे.

 

         तसेच नगरविकास विभागाला त्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील महत्वाचा वाटा असल्याने अजित पवार यांनी त्यांचे नाव देण्याचे सुचवले आहे. 


        राज्याचा आर्थिक आराखडा आणि महसूलवाढ संदर्भातील परिवहन विभागाची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात आणि गागरिकांमध्ये त्याविषयी असेलेला संताप याची दखल घेवून अहवाल सादर करण्याचे तसेच अपघात रोखण्यासाठी मोटर वाहतूक काड्याची कडक अंमलबाजवणी करण्यात यावी यासाठीही त्यांनी परिवहन विभागाला आदेश दिले आहेत.

 


 

मागे

मकर संक्रांतीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट
मकर संक्रांतीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

            पंढरपूर : आज मकरसंक्रांती दिवशी सावळ्या विठ्ठलाच्या आणि र....

अधिक वाचा

पुढे  

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ठरले जगातील आठवे आश्चर्य
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ठरले जगातील आठवे आश्चर्य

       नवी दिल्ली - सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वांत मोठा पुतळ....

Read more