By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2020 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : सुहाना ग्रुपचे संचालक सुधाकर शेट्टी यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीची धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनेक महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातबाबत हा छापा टाकण्यात आला आहे. डीएचएफल कंपनीचा प्रमोटर कपिल वाधवान याच्या चौकशीनंतर सुधाकर शेट्टी यांचे नाव उघड झाले आहे.
सुधाकर यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रानुसार अनेक नेतेमंडळींच्या झालेल्या व्यवहारांचा खुलासा झाला आहे. हरियाणाचे माजी मंत्री आणि महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या काही माजी मंत्र्यांशी आर्थिक व्यवहार स्पष्ट झाल्याचे समजते आहे. राज्यातील महत्वाचे नेते आणि सुधाकर शेट्टी जुहू परिसरातील जमीन व्यवहाराच्या चौकशीच्या वर्तुळात सापडले आहेत.
हरियाणामधील माजी मंत्र्यांच्या नातेवाईकच्या लग्नात सुधाकर शेट्टी यांनी कोट्यावधी रुपये खर्च केले होते. सुधाकर यांनी काही नेत्यांना हेलिकॉप्टरची मोफत सेवा पुरवली होती. सुधाकर यांच्या चौकशी दरम्यान २० कंपन्यांचा पर्दाफाश झाला आहे. या बनावट कंपन्याचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे समजते. गैरव्यवहाराबाबत शेट्टी यांनी चौकशी दरम्यान प्रश्नांना उत्तरे न दिल्याने ईडीतर्फे पुन्हा चौकशी होणार.
सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील झरे गावाजवळ अ....
अधिक वाचा