By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2020 10:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sirnaik) यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दोन दिवसांपुर्वी प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. यावेळी त्यांचे पुत्र विहंग सरनाईक (Vihang Sirnaik) यांची चौकशी झाली. आता याप्रकरणी ईडीने अमित चंडोल (Amit Chandole) यांना अटक केलीय. अमित चंडोल आणि विहंग सरनाईक एका कंपनीत पार्टनर आहेत. या कंपनीत आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन ईडीने चंडेल यांना अटक केलीय. दरम्यान विहंग सरनाईक यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावलंय.
प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा मारल्यानंतर त्यांच्या मुलाची देखील ईडीने चौकशी केली होती. या प्रकरणात एका सुरक्षा रक्षक कंपनीचे अमित चंडोल याला काल रात्री उशिरा ईडी ने अटक केली. आमदार प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झाले आहेत. आज दुपारी विहंग सरनाईक यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.
दिवसागणिक वाढणारी coronavirus कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्....
अधिक वाचा