By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 05:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - भारतासह दक्षिण-पूर्ण आशियातील प्रमुख विमान कंपनी ‘एयर आशिया’ च्या अधिका-यांविरोधात अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) कंपनीचे मुख्य अधिकारी टोनी फर्नांडिस यांना चौकशीसाठी २० जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
एअर आशियाच्या सीईओवर मनी लॉंन्ड्रिगचे आरोप करण्यात आल्याने प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. विमान कंपनीचे माजी सीईओ नरेश अल्गन, मूथ्थू चंडील्स, अरूण भाटीया यांनाही २० जानेवारीला चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
दरम्यान, एअर इंडियाने कॉंग्रेस (युपीए) सरकारच्या कार्यकाळात नियमात बदल करून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा अधिकार प्राप्त करण्यासाठी कट रचल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी कंपनीने अनेक नेत्यांसह अधिका-यांना लाच दिली असल्याचा ठपका कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे.
भुवनेश्वर - कटकमधील नरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-भुवनेश्वर लो....
अधिक वाचा