By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 08:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बुलढाणा
”तुला जीव द्यायचा तर दे, शिक्षणमंत्रीच काय, मुख्यमंत्र्यांकडे ही गेला तरीही तुला कागदपत्रे मिळणार नाहीत”, अशा प्रकारचा अतिरेक शेगाव येथील आयटीआय कॉलेजच्या (ITI Collage) प्राचार्यांनी विद्यार्थ्यांसोबत केलाय. पीडित विद्यार्थ्याने त्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय आणि कागदपत्रे मिळवून देण्याची मागणी केलीय.
बुलडाणा जिल्ह्यातील आम्रपाल भिलंगे या विद्यार्थ्याने शेगावच्या शासकीय ITI संस्थेमध्ये गेल्या 3 वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता. एक वर्ष त्याने नियमित कॉलेज केले, मात्र काही कारणास्तव तो नंतर कॉलेजला जाऊ शकला नाही. मात्र आता त्याला पुढील शिक्षण घायचे असल्याने त्याच्या शैक्षणिक कागतपत्रांची आवश्यकता असल्याने आयटीआय कॉलेजच्या प्राचार्य राजश्री पाटील यांच्याकडे मागणी केलीय. TC आणि इतर ओरिजनल कागदपत्रे काढण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून आम्रपाल भिलंगे हा चकरा मारतोय, तरीही त्याला कागदपत्रे मिळाली नाहीत, काल परत कागदपत्रे काढण्यासाठी गेला असता तेथील कर्मचारी यांनी प्राचार्य यांची परवानगी घेण्यास सांगितले.
आम्रपाल याने प्राचार्य पाटील यांना अतिशय विनम्रपणे विनंती केल्यावरसुद्धा त्यांनी अतिशय उद्धटपणे शिवीगाळ केली आणि आम्रपाल याला घालूनपाडून बोलल्या. तर आम्रपाल हा पुन्हा लिखित अर्ज घेऊन प्राचार्य पाटील मॅडमकडे गेला असता त्यावेळी ही प्राचार्य यांनी उद्धटपणे बोलल्या. मात्र यावेळी आम्रपालने मोबाईल कॅमेरा सुरू ठेवला आणि प्रचार्यांचे बोलणे रेकॉर्ड करून घेतले. प्राचार्य पाटील यांनी अगदी उद्धटपणे बोलत असताना तुला जीव द्यायचा असेल तर आताच दे, पण कागदपत्रे देणार नाही, शिवाय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना जरी सांगितले तरीही कागदपत्रे देणार नाहीत, असा पवित्रा घेतला.
हा संपूर्ण प्रकार आम्रपाल याने कॅमेऱ्यात कैद करून पत्रकारांना दिलाय आणि न्याय मिळवून देण्याची विनंती केलीय. तर याविषयी प्राचार्य राजश्री पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.
कोरोनापासून मुक्त होण्यासाठी भारताने पूर्णपणे कंबर कसली आहे. देशातील लोका....
अधिक वाचा