ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Election results 2019 : 'सीमोल्लंघन झालेलं आहे'; विखे-पाटील यांचे भाजप प्रवेशाचे संकेत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 02:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Election results 2019 : 'सीमोल्लंघन झालेलं आहे'; विखे-पाटील यांचे भाजप प्रवेशाचे संकेत

शहर : अहमदनगर

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यभरातही भाजप-शिवसेनेने दमदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगरमध्ये भाजपकडून निवडणूक लढणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

सुजय विखे पाटील यांचा विजय समोर दिसत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. 'माझं सीमोल्लंघन झालेलं आहे. अहमदनगर आणि शिर्डीचे अंतिम निकाल येऊ द्या,' असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी झी २४ तासच्या कार्यक्रमात केलं आहे. तसंच कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

अहमदनगरमधली जागा सुजय विखे पाटील यांना मिळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरपूर प्रयत्न केले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडायला नकार दिला. या जागेवर राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. अहमदनगरच्या जागेवरून झालेल्या वादानंतर विखे पाटील आणि पवार घराण्यामधलं जुनं वैरही काढण्यात आलं होतं.अहमदनगरच्या जागेच्या वादानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसनेही राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारला आहे

 

मागे

राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न,पोलिसांकडून अधिक तपास सुरू
राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न,पोलिसांकडून अधिक तपास सुरू

राफेल डीलचा आढावा घेण्यासाठी फ्रान्सला गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या राफे....

अधिक वाचा

पुढे  

Mumbai: Man booked for objectionable post on PM Narendra Modi's mother
Mumbai: Man booked for objectionable post on PM Narendra Modi's mother

One person has been booked for allegedly making objectionable comment about Prime Minister Narendra Modi's mother on social media, a senior police official said Wednesday. The case was register....

Read more