By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 21, 2019 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरा यांच्याविरोधात एल टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने देवरा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लोकसभा निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने मिलिंद देवरा यांना १९ तारखेला नोटीस पाठविली होती. शिवसेनेच्या वतीने अॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवली होती. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि १२५ या कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय.
विशाखापट्टम वर्गातील तिसऱ्या विनाशिकेचे आयएनएस इंफाळचे आज नौदल प्रमुखांच....
अधिक वाचा