By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आता शेतकर्यांना महाराष्ट्र राज्याने दिलास दिला आहे. शेतकर्यांना दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनींतर्गत’ महानिर्मिती अमरावती जिह्यातील गोवनकुंड येथे 16 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहेत. यामधून तयार होणार्या प्रतियुनिट विजेचा दर 3 रुपये 5 पैसे एवढा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजूर केला आहे.
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनें’तर्गत महानिर्मिती पहिल्या टप्प्यात राज्यात 200 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी काढलेल्या टेंडरमध्ये प्रतियुनिट विजेचा दर 3 रुपये 15 पैसे एवढा दर आला होता. त्यास मंजुरी मिळावी म्हणून महानिर्मितीने सादर केलेली याचिका वीज आयोगाने नुकतीच फेटाळली होती. त्यावर महानिर्मितीने पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर आयोगाने 16 मेगावॅटसाठी प्रतियुनिटचा दर 3 रुपये 5 पैसे एवढा मंजूर केला आहे. तसेच उर्वरित वीज प्रकल्प उभारण्यासाठी नव्याने टेंडर मागवून विजेचा दर कमी कसा येईल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश महानिर्मितीला दिले आहे.
नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना करणे सोपे झाले आहे. आतापर्यंत मु....
अधिक वाचा