By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 01:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढवा यासाठी निवडणूक आयोगाने शर्थीचे प्रयत्न केले. तथापि महाराष्ट्रात 65 ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात कॉंग्रेसचे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
गेले काही दिवस परतीचा पावसाने सतत रिपरिप सुरू ठेवली होती. मात्र मतदानाच्या दिवशी पावसाने जरा उघडीप दिल्याने दुपारनंतर शेवटच्या टप्यात मतदनाची टक्केवारी वाढल्याची चिन्हे आहेत. मात्र काही भागात दुपारपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर येथील वोटिंग बुथवर बत्ती गुल झाल्याने तेथे निवडणूक कर्मचारी मेणबत्तीच्या प्रकाशात काम करताना दिसत आहेत
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांसोबत लढताना महाराष्ट्राचे सुप....
अधिक वाचा