By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bhopal
भोपाळमध्ये एक अजबगजब प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं आहे. नवर्याने डोक्यावर शेंडी राखली म्हणून पत्नीने न्यायालयात पतीविरोधात घटस्फोटाची मागणी केली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर नवर्याने डोक्यावर शेंडी राखण्याचा संकल्प केला. मरेपर्यंत डोक्यावरील शेंडी कापणार नाही अशी भूमिका नवर्याने घेतली. मात्र हीच शेंडी नवरा-बायकोमधील घटस्फोटाचं कारण बनलं आहे.
दोन वर्षापूर्वी नवर्याच्या आई-वडिलांचा मृत्यू रस्त्यावरील अपघातात झाला होता. या मृत्यूनंतर मुलाने धार्मिक परंपरेनुसार डोक्यावर शेंडी राखली. अनेक दिवस ही शेंडी नवर्याने कायम ठेवली, त्यानंतर शेंडी कापून टाकावी यासाठी बायकोने नवर्यावर दबाव आणला. या क्षुल्लक कारणावरुन हा वाद कौटुंबिक कोर्टाकडे पोहचला आहे. नवर्याने शेंडी राखल्याने तो अडाणी दिसतो असं बायकोचं म्हणणं आहे. तिच्या माहेरच्या माणसांकडून नवर्याची खिल्ली उडवली जाते. ज्यामुळे मला अपमानित व्हावं लागतं असं बायकोकडून याचिकेत म्हणण्यात आलं आहे.
कौटुंबिक न्यायालयाकडून हे प्रकरण समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे. या समुपदेशनानंतर दोघांमधील वादाचं मुळ कारण नवर्याने डोक्यावर शेंडी राखल्याचे आहे. नवर्याने शेंडी राखल्याने तो अशिक्षित दिसतो. तो माझ्या टाईपचा नाही असं बायको सांगते. मात्र नवरा इंजिनिअर तर बायको एमबीए पास आहे. समुपदेशक सरिता राजानी यांनी सांगितले की या दोघांचे लग्न 2 फेब्रुवारी 2016 रोजी झालं होतं.
सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या ....
अधिक वाचा