ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 02:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे....

शहर : देश

दिवाळीआधी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना गिफ्ट दिलं आहे. ६ कोटी पीएफ धारकांना कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ)ने आर्थिक वर्ष २०१८-१९ या वर्षासाठी पीएफ खात्यात पैसे जमा केले आहेत. ८.६५ टक्के व्याजदराने हे पैसे जमा करण्यात आले आहेत. सरकारने जमा केलेले पैसे तुम्हाला ऑनलाईनदेखील चेक करता येणार आहेत.जर तुमचा UAN नंबर ईपीएफओकडे रजिस्टर असेल तर तुम्हाला पीएफ खात्यात किती पैसे आहेत, याची माहिती एसएमएसवरच मिळेल. तुम्हाला फक्त 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG लिहून एसएमएस करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला पीएफ खात्यात किती रक्कम जमा आहे ते कळेल.

मातृभाषेतही तुम्हाला पीएफबद्दलची माहिती मिळते. जर तुम्हाला मराठीमध्ये माहिती पाहिजे असेल तर EPFOHO UAN MAR लिहून मेसेज करावा लागणार आहे. अशाच प्रकारे हिंदी, पंजाबी, कन्नड, तेलगू, तामीळ, मल्ल्याळम आणि बंगाली भाषेतही ही माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षर EPFOHO UAN च्यापुढे इंग्रजीमध्ये लिहावी लागणार आहेत.

जर तुम्हाला ऑनलाईन तुमचं पासबूक पाहायचं असेल तर https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login या वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे.पीएफ खात्यातल्या रकमेची माहिती हवी असल्यास तुमचं UAN आणि बँक खातं, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे.

पुढे  

जवानांसाठी खुशखबर, कुटुंबासोबत दरवर्षी घालवता येणार शंभर दिवस
जवानांसाठी खुशखबर, कुटुंबासोबत दरवर्षी घालवता येणार शंभर दिवस

भारतीय सैनेतील जवानांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवानांना कमीत कमी 100 दिवस ....

Read more