ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रकाशन विभागाच्या ई-प्रकल्पांचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 05:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रकाशन विभागाच्या ई-प्रकल्पांचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

शहर : delhi

दिल्लीतील सूचना भवन येथे प्रकाशन विभागाच्या अनेक ई-प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात प्रकाशन विभागाची नवी वेबसाईट , 'डिजिटल डीपिडी' हे ॲप रोजगार समाचारची ई-आवृती आणि 'सत्याग्रह गीता' पुस्तकाच्या ई आवृतीचा समावेश आहे.

यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले कि, प्रकाशन विभागाची नवी वेबसाईट अत्याधुनिक, गतिमान आणि आकर्षक दिसत असून वेबसाइटला लोक वारंवार भेट देतील तसेच प्रकाशन विभागाने सुरू केलेल्या नव्या ॲप मुळे ई-बूक आणि किंडलच्या काळात लोकांमध्ये वाचनाच्या सवयी वाढविण्यासाठी मदत होईल.

सुप्रसिद्ध कवयित्री डॉ.क्षमा राव यांनी लिहीलेल्या 'सत्याग्रह गीता' या पुस्तकाची ई-आवृती ही यावेळी प्रकाशित करण्यात आली. राव यांनी महात्मा गांधी यांचे आयुष्य आणि कार्य यांचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक या पुस्तकात लिहिले असून 1930 साली याची पहिली आवृती प्रसिद्ध झाली होती.

 

मागे

कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याची कंपनीतच आत्महत्या
कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याची कंपनीतच आत्महत्या

हिंजवडी परिसरातील एमकयूआर कंपनीत काम करणारा कामगार सुंदर गोरटे याने कंपनी....

अधिक वाचा

पुढे  

मॉस्को मध्ये इस्रोच्या संवाद केंद्राला मंजूरी
मॉस्को मध्ये इस्रोच्या संवाद केंद्राला मंजूरी

इस्रो तर्फे देण्यात आलेल्या संवाद केंद्राच्या प्रस्तावाला मोदी यांनी आज म....

Read more