ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे - राज्यपाल रमेश बैस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2023 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे - राज्यपाल रमेश बैस

शहर : देश

'मेरी माटी मेरा देश' अभियानात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

 

मुंबई, दि. २९ : देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला देश विश्वगुरू व्हावा, असेच वाटते त्यासाठी आपापल्या क्षेत्रात देशाच्या विकासाचे लक्ष्य समोर ठेऊन कार्य केले तर नक्कीच आपला भारत देश विश्वगुरु होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले.

       राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते  प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश' या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मातृभूमी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

      याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अर्पिता राय, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजकुमार पाल आणि अभियानात सहभागी असलेले प्रतिनिधी उपस्थित होते.              

     यावेळी राज्यपाल श्री.बैस म्हणाले, देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ’माझी माती माझा देशअभियानातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासीक वारसा जोपासण्याचे काम केले.

        या अभियानात महाराष्ट्राने दिलेल्या बहुमोल योगदानाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली यांचा अभिमान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप आपणमाझी माती माझा देशया राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रमातून स्वातंत्र्यसैनिकांना, शहिदांना नमन आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करुन साजरा केला. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा निर्धार केला आहे त्यांचे स्वप्नं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करुया, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

 

मागे

महालक्ष्मी सरस 2023-24 ला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद
महालक्ष्मी सरस 2023-24 ला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई, दि. 29 : वांद्रे (पूर्व) येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे सुरू असलेला महाराष्....

अधिक वाचा

पुढे  

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन '
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्याचे आवाहन '

'सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय क....

Read more