ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशाला आर्थिक संकटातून वाचण्यासाठी चिदंबरम यांचा १० कलमी कार्यक्रम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 11:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देशाला आर्थिक संकटातून वाचण्यासाठी चिदंबरम यांचा १० कलमी कार्यक्रम

शहर : देश

कोरोना वायरसच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे ऐतिहासिक युद्ध असल्याचे सांगत माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सरकारला १० कलमी कार्यक्रम सुचवला आहे. लॉकडाऊनच्या स्थितीत सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती अधिक खालावते. हे पाहता पैसे आणि किराणा तात्काळ पोहोचल्यास ते घरातून बाहेर येणार नाहीत.

पी.चिदंबरम यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोनाच्या विरोधात युद्ध सुरु असून सर्व जनता सैन्य तर पंतप्रधान हे सेनापती आहेत. त्यामुळे पंतप्रधान, केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनांचे पालन करणं हे आपलं कर्तव्य असल्याचे चिदंबरम म्हणाले. घरातून बाहेर न पडण्याची युद्धघोषणा योग्यच आहे. पण आता २१ दिवसांची योजना देखील आपल्याला करावी लागेल. यामुळे सर्वसामांन्यांच्या दैनंदिन जिवनात अडथळा येणार नाही.

प्रधानमंत्री किसान योजनेची रक्कम दुप्पट करुन ६ हजाराची रक्कम १२ हजारांपर्यंत न्यायला हवी. ही अतिरिक्त रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात तात्काळ टाकायला हवी.पट्ट्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यामध्ये सहभागी करायला हवे. मनरेगाच्या अंतर्गत नोंदणीकृत मजुरांच्या खात्यामध्ये तात्काळ ३ हजार रुपयांची रक्कम टाकायला हवी. शहरी क्षेत्रातील गरीबांना मदत पोहोचवण्यासाठी जनधन बॅंकेमध्ये अकाऊंट असलेल्या खातेधारकांना ६ हजार रुपये दिले जावेत.

२१ दिवसांत १० किलो तांदुळ मोफत

शिधा धारकांना देखील २१ दिवसांमध्ये १० किलो तांदुळ किंवा गहू मोफत घरपोच दिले जावेत. कोणत्याही नोंदणीकृत कंपनीने कर्मचाऱ्यांमध्ये कपात करु नये. अशा संकटात १ महिन्याचा पगार सरकार देईल याची शाश्वती द्यायला हवी.

मागे

लॉकडाऊन' नंतर मुंबईतील सोसायट्यांचा महत्वाचा निर्णय
लॉकडाऊन' नंतर मुंबईतील सोसायट्यांचा महत्वाचा निर्णय

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान मांडल आहे. मुंबईतही कोरोनाबाधित रूग्णांचा आ....

अधिक वाचा

पुढे  

देशात कोरोनाची रुग्णसंख्या ६०० वर तर मुंबईत आकडा पन्नाशीपार
देशात कोरोनाची रुग्णसंख्या ६०० वर तर मुंबईत आकडा पन्नाशीपार

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. स्पेन, इटली आणि अमेरिकेतील स्थिती ....

Read more