By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2020 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर सर्व गोष्टी उघडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या 87 लाख पार गेली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर लस शोधण्याचं कामही वेगात सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून सध्या कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु आहे. यावेळी एका स्वयंसेवकाने मॉडर्ना लसीचा अनुभव सांगितला.
काय आहे स्वयंसेवकाचा अनुभव?
मॉडर्ना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी नॉर्थ कॅरोलिनाच्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका स्वयंसेवकाने आपला अनुभव सांगितला आहे. चाचणीदरम्यान त्याला अनेक साईड इफेक्ट्स पाहायला मिळाल्याचं त्याने सांगितलं. चाचणीदरम्यान पहिले इंजेक्शन घेतल्यानतंर त्याला ताप आणि वेदनेचा सामना लागला. मात्र, चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही लस घ्यायला हवी असं या विद्यार्थ्यानं आवर्जुन सांगितलं आहे.
कोरोनाची देशातील स्थिती
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 44 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 520 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकणू कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 87 लाख 73 हजार 479 वर गेला आहे. तर 1 लाख 29 हजार 188 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाची जगभरातील आकडेवारी
जगाची आकडेवारी पाहिली तर जॉन हॉफकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोनारुग्णांची संख्या 5कोटी 43 लाख 11 हजार 813 वर जाऊन पोहोचली आहे. तर जगात आतापर्यंत 13 लाख 17 हजार 397 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डीजिटल दिवाळी!
करोनाची पार्श्वभूमी तसेच प्रदूषणाचा विचार करुन या वर्षीची दिवाळी फटाके न फोडता साजरी करण्याकडे नागरिकांचा कल दिसतोय. देशातील तरुणांकडून डिजीटल दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं सावट आहे. दीपावली उत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्र, दिल्ली सरकारने राज्यातील नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरं उघडण्यास सरका....
अधिक वाचा