By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकमान्य टिकळ टर्मिनस हे मुंबईतील प्रवाशांनी नेहमी भरलेलं स्थानक आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस या स्थानकावरुनच सुटतात. लोकमान्य टिळक टर्मिनसवर उभ्या असलेल्या शालीमार एक्सप्रेसमध्ये स्फोटकं सापडल्याची माहिती समोर येते आहे, अशा ठिकाणी स्फोटकं सापडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने फारच गंभीर आहे.
बॉम्बविरोधी पथक या ठिकाणी दाखल झालं आहे. स्फोटकं सापडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शालीमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. एक्सप्रेस आणि स्थानकावर आणखी काही स्फोटकं नाही याची तपासणी सुरु आहे.
आरे कॉलनीतल्या सुमारे १२० एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी स....
अधिक वाचा